[४२१] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाबूराव सदाशिव साष्टांग नमस्कार विनंति. दरगाकूलीखान यास शहरची सुभेदारी जालियाचें पत्र आपण पाठविलें तें पावोन वर्तमान अवगत जालें. त्यास भवानीशंकर रत्नाकर यासमागमें वस्त्रें खानास पाठविली आहेत. ही आपण पाहून त्यांजकडे पाठवावी. हे विज्ञापना.
[४२२] श्री.
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
पोष्य बाळाजी विश्वनाथ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ माघ वद्य १४ पावेतों सुखरूप असों. विशेष. आपण महायात्रेस कधी निघणार हा निश्चय करून आह्मास ल्याहावें. त्याजप्रमाणें निघावयाची तजवीज करावी लागत्ये, याजकरितां लिहिलें आहे. व आह्मास डोलिया पाहिजेत, याजकरितां स्वामीस सांगितलें आहे. तर कृपा करून दोन डोलिया ठीक कराव्या आणि लेहून पाठविले पाहिजे. बहुत काय लि॥ कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.