[४१२] श्री. डिसेंबर १७५२.
पत्र बनाम श्रीमंत रघूजी भोसले :-
आशीर्वाद उपरि. आपण सुभे वऱ्हाडांत जफ्ती केली व खंडण्या मुकरर करीत आहांत. त्यास सुभे वऱ्हाडांत जागीर, कसबे माहोली व मौजे कापशी व मौजे ब्राह्मणवाडा परगणें दयापूर, व मौजे बोलाड परगणे मलकापूर ऐसे चार गांव श्रीमंतराव केशवरावजी हरकारे पातशाही यांची आहे. दिल्लीत पातशहाजवळ असतात. पुत्र त्यांचे राजश्री मुकुंदरावजी दक्षणचे सुभेदारापाशी असतात, हें तुह्मीं जाणतां त्यास, श्रीमंत पंतप्रधान पंतांही जफ्ती सुभे अवरंगाबाद व सुभे खान देशची केली; परंतु श्रीमंतराव केशवरावजी हरकारे यांचे जागिरीची केली नाही. ताकीदपत्रें, नांव ऐकतांच याप्रकारें करून दिधली कीं, श्रीमंतराव केशवरावजीचे जागिरीस जफ्ती करून जो ऐवज घेतला असेल तो फिरून दीजे, त्यांचे जागिरीस मुजरीम न होणे, त्यांचे चाललें अगत्य असे. हें सर्व आह्मां देखतां जालें. श्रीमंतराव केशवरावजी हरकारे यांची योग्यता याचप्रकारें आहे. तुह्मी श्रीमंत पंत प्रधानजीचे प्रमाणे ताकीदपत्रें करून दीजे. जो वसूल जागिरीपैकी घेतला असेल तो फिरून देवणें. पुढे मुजाहीम न होता तें करणें. व जमीदाराचे नांवें ताकीदपत्रें देणें की, पटिया घासदाणा वगैरे न करीत. श्रीमंतराव केशवरावजी हरकारें यांचे हातें कामें बहुत घेणें आहेत. आमचें लिहिणें सर्वप्रकारे मान्य करून पत्र पावतांच ताकीदपत्रें कळोन दिधली पाहिजेत. यासाठी वारंवार लिहिलें. हे गोष्ट करणें.