[४११] श्री. ३० आक्टोबर १७५२.
पौ आश्विन वद्य ३० रविवार
शके १६७४. बराबर हरी व यमाजी
जासूद जमात भवानी नाईक
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असावें. विशेष. राजश्री रामाजी केशव यास, परगणे जैनाबाद व माजरोप या दोन्ही परगणियांची कमावीस सांगोन रसदेचा ऐवज पन्नास हजार रुपये व कर्जाचा ऐवज पन्नास हजार रुपये केले आहेत. त्याची बोलीचाली आपलेच मार्फतीनें करार जाली आहे. त्याप्रमाणें महालच्या सनदा व पन्नास हजार रुपयांचें खत ऐसें पाठविलें आहे.पावेल. रसदेचा ऐवज कराराप्रमाणें सरकारांत भरणा करावा कर्जाचा ऐवज कार्तिक शुध्द पूर्णिमेस द्यावयाचा करार आहे. तथाप आणखी आठ पंधरा दिवस लागले तरी लागोत. अखेर कार्तिकपावेतों भरणा करून द्यावा. सरकारामध्यें ऐवजाची गरज आहे. ऐवज क्षेपनिक्षेप देवावा. राजश्री रामाजी केशव ऐवज द्यावयाविशीं कांही अनमान करतील. त्यांस आपण सांगोन ऐवज खामखां देवावा. रा छ २२ जिल्हेज, सु॥ सलास खमसैन मया अलफ. हे विनंति.