[४१०] श्री. १५ आक्टोबर १७५२.
पौ आश्विन शुध्द ८ रविवार
शके १६७४.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. पत्रें एक दोन येतां येतां याप्रमाणें येत गेली ह्मणून येथून यावयाविशीं लिहिलें नाहीं. तुह्मीही न आलां. त्यास भेटीचें प्रयोजन जरूर आहे. कित्येक मनसुबियाचा निर्गम केला पाहिजे. त्याजकरितां शहानवाजखान वगैरेंच्या आमच्या भेटी होणार. एक दोन रोज तेथें मुक्काम होतील. तर लवकर यावें. कर्ज पांचपावेतों जरूर मेळविले पाहिजे. हे विनंति.