[३५७] श्री.
तीर्थस्वरूप महाराज श्री परमहंस स्वामीचे सेवेसी :- अपत्ये बालकें राधाबाई व त्रिंबकराऊ ढमढेरे सा॥ दंडवत विनंति येथील क्षेम तों आशीर्वाद स्वामीचा येथास्थित असे. विशेष. कृपावंत होऊन लेंकरास प्रसादवस्त्र नेसावयासी पा॥ तें घेऊन मस्तकी वंदोन आज्ञेप्रमाणें परिधानास लाविलें. सखलाद आलनास आणविली. तेच आज्ञेवरून पाठविली. सेवेसी प्रविष्ट होईल. सदैव लेंकरावरी माया धरून कल्याणवृध्दि होय ऐसें करावयासी स्वामी समर्थ. हे विनंति.
[३५८] श्रीपरशराम.
वेदमूर्ति राजमान्य राजश्री रामचंद्र जोशी तथा र॥ विनायक जोशी व र॥ नरशी जोशी यांसी श्रीची आज्ञा :- तुमचे वडील वंशपरंपरेनें श्रीची सेवा परम एकनिष्ठेनें करून श्रीची कृपा संपादून घेत होते. आणि तुह्मीही बहुत प्रकारें श्रीचे सेवेसी तत्परच होतेत. परंतु श्रीचे भक्तांनीं खेळ मांडिला होता. खेळतां खेळतां तुमचा रगाडा केला, ह्मणोन तुह्मी देशास जाऊन क्लेशी जाहलेत. हें देखोन, हिंदुमुसलमान हे दोन्ही भक्त खेळत होते, यांचा खेळ राहिला, याजपुढें हे तुह्मांस दु:ख देणार नाहींत. यास्तव, सर्व लहान थोर अवघे येऊन, चिपळुणांत राहोन, पूर्वस्थितीनें वर्तत जाणें. श्री महीन्द्रगिरी हा अवघा मीच आहे. मजवरी मातृघर व श्रमी राहोन मजला दु:ख न देणें. येवढें क्षेत्र तुह्माकारणें निर्माण केलें आहे. इतक्यामध्यें मनास येईल तेथें रहाणें. श्रीस्थळी तपस्वी, संन्यासी, ब्रह्मचारी ऐसे रहावयासी आज्ञा आहे. बळात्कारें रहाल तरी पूर्वप्रमाणें होईल. ऐसें समजोन परशरामजयंतीचें सर्व साहित्य घेऊन सत्वर येणें. गोसावी न ये ह्मणोन अनमान कराल, तरी पूर्वीपासून कांही गोसावी नव्हता. ऐसे किती भक्त जाहाले. पुढेंही होतील. त्यास श्री तिरस्थळी यात्रा करावयासी सावी नव्हता. ऐसे भक्त जाहाले. पुढेही होतील. त्यास श्रीतिरस्थळी यात्रा करावयासी आज्ञा केली आहे. त्याचे सेवक असतील त्याणी त्याजबराबरी जाणें. श्रीची बाळें असतील ती श्रीसंनिध जयंतीकारणें येतील. सर्व सूचना हेच असे. हे आज्ञा.
हेच कृष्णशेटीस आज्ञा कीं, पत्रार्थाप्रमाणें वर्तोन सत्वर भेटीस येणें. अरिष्ट दूर कर्ता श्री समर्थ आहे.
१
पर्वतदीगार
दौलतवंत :-
दुवागो पर्वतदीगार याचें बाळक मलंग फकीर दिन दिन बोलत व उमर ज्यादा हू.