[३५०] श्री. ३१ आगष्ट १७४९.
सरकार दरुनीमाहाल यांणीं राजश्री मंबाजी पाणसरे हवलदार व कारकून दि॥ श्री मु॥ किल्ले प्रतापगड यासी आज्ञा केली ऐसीजे :-
राजश्री संभाजी राजे याजकडील ब्राह्मण अनुष्ठानास श्रीपाशीं आले आहेत ह्मणून हुजूर विदित जालें. तर त्यांस अनुष्ठान करूं न देणें. राजश्री स्वामीस समाधान नाहीं. ते आरोग्य जालियावर, त्यांजकडे जावोन, स्वामीपाशी आज्ञापत्र मागोन, आह्मांस घेवोन येणें. उपरांतिक अनुष्ठान करणें, ह्मणोन स्पष्ट सांगोन, किल्ल्याखालें लावून देणें, आणि स्वामीस बरें वाटत नाहीं येविशीं श्रीची प्रार्थना करून, श्रीवर संकट घालून, किती दिवसांत उतार पडेल तो विचारून, प्रसाद व तीर्थ स्वामीस पाठवून देणें. जाणिजे. छ २८ रमजान. लेखनसीमा. सहीं.
सनखमसैन.
[३५१]
व्यर्थ! याचेनें कांही होत नाही! हे घोड्यावर घोडें घालून पैका काढून घेतील. आह्मी सेवेसी पाहोन राजा आला तर भेटीस बोलावूं. तर येणेप्रमाणें बेगी रवाना करणें गुलाब, शिसें संग्रही असेल तर दोन गोष्टी एकांती या माणसाजवळ विचारणें.