[२९५] श्री.
पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. उपरि. नारो गोविंद साखळकर खोत मौजे डोळे यांसी. दामो पुरुषोत्तम मौजे मजकूर याणें भुताचें तुफान नसतां लिगाड लावून विशालगडीहून तगादा करिविला आहे. त्यांजविशीं आज्ञा केली. त्यावरून हरदूजणांस हुजूर आणविले आहे. मनास आणून दामो पुरुषोत्तम यांचें पारपत्य केलें नाहीं. अनंतप्रभू कानडा याणें गोठणें येथील खाजणाकरितां कटकट करितो त्यांजविशी आज्ञापिलें. त्यावरून अनंतप्रभू यास ताकीद केली आहे. फिरोन मौजे मजकुरी याणें कटकट केली तरी मुलाहिजा होणार नाहीं. असें त्यास ताकीदपत्र पाठविलें आहे व डोळेकर हुजूर आणविले आहेत. यथान्याय पारपत्य करून स्वामीची आज्ञा ते प्रमाण. आपले आज्ञेस अंतर पडणार नाहीं. विदित जालें पाहिजे. बहुत लिहावें तो स्वामी वडील आहेत. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना.