त्याचें स्मरण आतां करावें ऐसें नाहीं. ब्राह्मणाविना दत्त बोलिलों नाहीं. हें तों यथार्थच असे. तथापि, ज्याचें त्याणेंच दत्त दिल्यास प्रत्यवाय काय असे ? देवाचा रुका ठेविल्यास अकल्याणावह ह्मणून :- तरी यांत संशय काय ? स्वामींनीं श्रमें करून अर्जिलें द्रव्य आणि सत्कर्मीं व्यय केला हें तों विश्वतोमुखें कळलेंच असे. आह्मीं देणें आहे तें ना असें ह्मणत नाहीं. उभयतां चिरंजिवांचें स्वामीचे आशीर्वादेंकरून उत्तरोत्तर कल्याण जाहल्यास कर्जाचा विषय थोडकाच असे. स्वामीचे कृपेनें कर्जाचाही परिहार होईल. राहतें ऐसें नाहीं. चार दिवस मागें पुढें इतकाच अर्थ. हत्तीमुळें स्थळत्याग झाला :- तर दुष्टासी प्रसंग पडिलियास विचारें वर्तावें हे गोष्ट तो उचित असे. बापूजीचे महाजनकीचे कुलाबास लिहिलें होतें ह्मणोन आज्ञापिलें:- तर चिरंजीव स्वामीचे आज्ञे वेगळे आहेत ऐसें नाहींत. जें कार्य जे समयीं होणें तेच समयीं होतें. स्वामीच्या चित्तांत जो अर्थ आला आहे तो घडणें तेव्हां घडेल. बजूबाई राजूबाई यांच्या वोटया होनानें भरल्या तें वृत्त तुह्मांस न कळे ह्मणोन :- तरी आह्मीं न पाहिलें; परंतु स्वामीच्या मुखें तों यापूर्वीं ऐकिलें असतां आह्मांस न कळे ऐसें नाहीं. देवाचा रुका ठेविल्यास वेल वाढणार नाहीं ह्मणोन आज्ञा :- तर बावा ! पादा पादा स्वामींनीं ऐसा आशीर्वाद न द्यावा. स्वामीचे आशीर्वादाचा खांद्या दोन आहेत. त्यांचा विस्तार, पल्लव, शाखा होऊन हें अर्जिलें आहे, याचें संरक्षण होय ऐसा स्वामींनीं पूर्ण आशीर्वाद द्यावा हे गोष्ट स्वामीस उचित आहे. आजसारखा आशीर्वाद दिल्यास तुमचे ऋणानुबंधी तुह्मांस स्वर्गलोकीं हंसतील ! सारांश, अर्थ, हा मनसबा अवघा स्वामीचा आहे. तेथें विस्तार काय लिहावा ? स्वामी सर्वज्ञ आहेत. मुख्य गोष्ट, मजपासून अंतर पडलें ऐसें आपले चित्तांत आलें असलें तर स्वामीनें येऊन, दर्शनाचा लाभ देऊन, बोल लावणें तो लावावा, तो शिरसा असे. कागदींपत्रीं कोप न करावा. बहुत काय लिहिणें. कृपा असो दीजे हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57