[२९२] श्री.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्येंसन संभाजी आंगरे चरणावर मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि येतील कुशल तागाईत वैशाख शुध्द त्रयोदशीपर्यंत स्वामीचे कृपावलोकनें करून सुखरूप असों. यानंतर बहुता दिवशीं स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें संतोषाच्या कोटीच प्राप्त जाहल्या. याच न्यायें सर्वदां आशीर्वादपत्रिका पाठवून अपत्याचा सांभाळ करणार स्वामी थोर आहेत. विशेष मुतडीचे हाजनकी बापूजी बागुल यासी द्यावी, ह्मणून धावडसीस भेटीचे समयीं मागितली, आह्माजवळ मान्य केले, तीनशें रुपये दिल्हे ते घेतले, आणि आतां वाकडयाचे गोष्टी करतां आह्माशीं +++++++++ आहे. तेथून जें महाजनकीविशीं लिहिणें तें स्वामीस लिहिलें येईल. वरकड, मी चरणरज स्वामीचा आहे. स्वामीचे सेवेसी तत्पर आहे. आशीर्वाद पूर्ण असो द्यावा. हे विज्ञापना.