[२६३] श्री.
पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति. आफोडकरांचे गांवाविशीं स्वामीनीं आज्ञापत्रीं आज्ञा केली. ऐशास त्यांची कोड वतनी आहे, ती त्यास देऊन ह्मणोन स्वामीचे दर्शनास आलों. ते समयीं मान्य केलें त्याप्रों। सातारियाचे मुक्कामीं पत्रें करून दिल्ही आहेत, त्याप्रमाणें चालेल. कळलें पहिजे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
[२६४] श्री.
पुरवणी श्रीमत् सकलतीर्थस्वरूप विनंति उपरी. अर्ज्या दिवट्या याचे बायकोविशीं लिहिलें, ऐशास ते पहिलीच र॥ केली आहे. पावली असेल. प्रसाद पेढे पाठविले ते प्र॥ जाहले. |
श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेशी. कावजी कदम याणें साठ रुपये देऊन बटीक घेतली होती. ते चिरंजीव संभाजी आंगरे याणें नेली आहे. ते पाठवून द्यावयाविशीं एक दोन वेळां पत्रीं आज्ञा केली. त्यावरून तहकियात करितां आणली, ऐसा शोध लागला नाहीं. शोध लागलियावर पाठऊन देऊन. |
बहुत काय लेहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे हे विनंति. |