[२४७] श्री. २७ अक्टोबर १७३३.
श्रीमत् सकल तीर्थास्पदीभूत श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेसी :-
अपत्ये सेखोजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल कार्तिक शुध्द प्रतिपदा मंदवासरपर्यंत स्वामीचे कृपेंकरून कुशल असे. विशेष. स्वामीनीं पेशजी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. कितेक पदार्थ आह्मापासून अंतराय जाहल्याचा अर्थ स्वामीनीं लिहिला, त्याचा परिहार केल्यानें होत नाहीं. स्वामीचें दर्शन होईल तेसमयीं साद्यंत विदित करून. ऐवजांविशीं स्वामीनीं लिहिलें, त्यावरून पेशजी रु॥ दोन हजार पाठविले होते. हल्लीं रुपये ३००० तीन हजार पाठविले आहेत. प्रविष्ट होतील. दत्ताजी कनोजे याची मुक्तता करून मागाहून स्वामीकडेस पाठवून देऊन. चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे कुलाबियास आले. त्याची आमची आजीच भेटी जाहाली. हें संतोषाचें वर्तमान स्वामीस विदित व्हावें, याकरितां लिहिलें असे. बहुत काय लिहिणें. कृपा असो दीजे. हे विनंति.
सुमार जमा रुपये | |
२००० | छ ३ रबिलाखर गु॥ जोगोजी सावंत आश्विन- मास, सु॥ इहिदे (५ अक्टोबर १७३०). |
३००० | छ ६ जमादिलावल, कार्तिक शुध्द, सन इहिदे गु॥ बहिरजी महाडिक (८ आक्टोबर १७३०). वगैरा. |
-------- | |
५००० | |
१००० | छ २६ रबिलाखर, सन इसन्ने सलासीन आश्विन वदि त्रयोदशी रविवार गु॥ नारायण हरकारा (१७ अक्टोबर १७३१). |