[२४५] श्री. तालिक
१५ सप्टंबर १७२९.
राजश्री बावाजी ह्मसके नामजाद किल्ले जयगड गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ सेखोजी आंगरे रामराम. सु॥ सलासीन मया व अलफ. श्रीमत् परमहंस गोसावी यांस मौजे करजुवें येथील जमीन बिघे २० वीस इनामत तीर्थरूप कैलासवासी यांनी दिली आहे. त्यास ते श्रीपरमहंसबावांनी जगंनाथ चिमणाजी दि॥ म॥ यास इनाम देविलें. त्याप्रमाणें तुह्मी साल दरसाल त्याची कीर्द होईल ते जगंनाथ चिमणाजी याचे नांवें खर्चलिहीत जाणें. छ २ रविलावल.