[२४०] श्रीराम. ५ जून १७२६.
राजश्री येसाजी थोरात गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ रामचंद्र नीळकंठ हुकुमतपन्हा आशीर्वाद. सुहुरसन सीत अशर मया व अलफ. मौजे बाहे त॥ वाळवें या गांवाशीं तुह्मी कथळा करतां, निमे गांव र॥ शामजी रुद्र यांणी आपणास दिल्हा ह्मणता, ह्मणून विदित जालें. तरी तो गाव र॥ त्रिंबक सुंदर यांस इनाम दिला असतां तुह्मांस अथवा शामजी रुद्र यांस त्या गांवाशीं संबंध काय आहे ? तेथील ऐवज आणवणें तो शामजी रुद्र आणवून मशारनिलेस पावितील. येविशीं पूर्वी त्यासहि आज्ञा केली आहे त्याप्रमाणें रहाटी करितील. तुह्मी मौजे मजकुरास एक जरा आपले तर्फेनें उपसर्ग न करणें. फिरोन बोभाटा हुजूर येऊं न देणें. जाणिजे. छ २१ सौवल. बहुत काय लिहिणें.
लेखनसीमा
उल्लसति