[२३७] श्री.
राजमान्य राजश्री अप्पाजी सोमवंशी सरलष्कर यांसी
आज्ञा केली ऐसीजे :- सुपें प्रांतीची कमावीस भिकाजी बल्लाळ यास सांगितली होती. तेणेंप्रमाणें करार करून चालवणें. अगर तुमचे चित्ती दुसरियास सांगणें असेल तरी सुखरूप सांगणें. या मामल्यामुळें यास कर्ज जाहालें आहे त्याचा निकाल करून रोखा पाठवून देणें. नाही तरी याच्या कर्जाचा ऐवज पावे तवपावेतों याचा मामला यास करार करणें. यास मामला सांगितला असतां करारांत तफावत करणें हे गोष्ट उचित नव्हे. मामला आणिक सांगावा असेंच असेल तरी याच्या ऐवजाचा निकाल होऊन आला पाहिजे. त्याचा तूर्त निकाल करून पाठवणें. अथवा लिहिल्याप्रमाणें हप्तेबंदी पावेतों करारांत तफावत न करितां याकडे मामला करार करणें. + यास सुपे प्रांतीची कमाई सांगितली व्हती. ते चालवन. जर दुसऱ्या(स) देन अस(ल) तर देन. याचा कर्जाचा ऐवज यास रोख पाठवन. नाहींतर कर्ज फिटे तों राखन. मामला हफतेबंदीपावेतो करारांत तफावत करन हें उचि(त) नव्ह. सुदन असा.