[२२७] श्री. १६ नोव्हेंबर १७६०.
... ... ... खासा स्वारीसमागमें नबाब निजामअल्लीखानसहवर्तमान नर्मदातीरास सत्वर येऊन पोहोचणार. तर बैल लौकर लि॥ पो खरीदी करणें. मजलदरमजल निजामअल्ली व जानोजी भोसले सेनासाहेबसुभा, पन्नास हजार फौजसुद्धां, खासा स्वारी मार्गशीर्षात येते. तुह्मी र॥ गोविंद बल्लाळ यांस व तमाम राजेरजवाडे यांस लेहून सारे जमा होऊन सामील होणें. र॥ छ ७ रबिलाखर. मु॥ गंगा उत्तरतीर. हे विनंति.
[२२८] श्री. २२ नोव्हेंबर १७४९.
राजश्री कोनेरपंत गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. आह्मी नांदेडानजीक गंगा उतरोन आलों. पुढें तुळजापूरसंन्निध अविलंबेच येत असों. राजश्री विसाजी रघुनाथ व विसाजी गोविंद यांसी रवाना केले आहेत. सविस्तर अर्थ उभयतां सांगतील त्याप्रमाणें ध्यानास आणून राजश्री फत्तेसिंगबावा यांसी फौजेसह तुळजापूरप्रांतें शीघ्र घेऊन आलें पाहिजे. तुमच्या आमच्या भेटी अंतीं योजिला मनसबा होऊन येईल. र॥ छ २२ हे जिल्हेज. + बहुत काय लिहिणे. हे विनंति. सत्वर येणें. कुणे गोष्टीचा दुसरा विचार चित्तांत ण अनता सत्वर येणें. हे विनंति.
मोर्तबसूद.