[२२५] श्रीलक्ष्मीकांत. २ जून १७५७.
*
श्रीशाहूराजपदांभोजभ्रमरायित
चेतस: बिंबात्मजस्य मुद्रेशा
राघवस्य विराजते
आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा त॥ देशमुख मोकदम क॥ सिरसगांव प॥ रीधपूर सु॥ सबा खमसैन मया अलफ. सालमजकूरणे मोगलाई चुकोतीबद्दल हुजूर येणें. या कामास स्वार पाठविले आहेत. यांसी मसाला मोकरर रुपये आदा करणें. जाणिजे. छ १४ हे रमजान. मोर्तबसूद.
[२२६] श्री. ३ जुलै १७६०.
... ... ... विशेष. कमाणाचे प्रयोजन आहे तरी कमाणा सुमार २५ बाळाबोटी, सदर्हू कमाणापैकी निमे निरम व निमे सख्त, याप्रमाणें पाठवून देणें जाणिजे. छ १२ जिलकाद सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.