[२०९] श्री.
राजश्री कोनेर पंतदादा गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ राणोजी भोसले दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. तुह्माकडील वर्तमान बहुत दिवस कळत नाहीं. तेणेकरून चित्त उदास आहे. तर आपणांकडील सविस्तर वृत्त, आलिया जासुदाबरोबर पत्रीं परामृष करीत गेले पाहिजे. यानंतर आह्माकडील वर्तमान तर पेशजी घेस घे कळो आले असेल. सांप्रत आमचे सरंजामात तीर्थस्वरूप राजश्री रघोजीबाबांनी अमलात खलल करून आह्मावर मोगलांची फौज ऐसे आह्मावरी रवाना केली असे कळले पाहिजे. तेथे दरबारी आपण आहेत. याजउपरी आपण चित्तावरी घेतल्याखेरीज याचे पारपत्य होत नाहीं. तीर्थरूप राजश्री बाबासाहेब तेथे गेले आहेत. ते व आपण मिळोन पेशजीप्रमाणे सरंजाम वाजवीप्रमाणे ठीक करून राजपत्रें घ्यावी. सर्व भरवसा तुमचा आहे. तुह्मी वित्त पुरविल्याखेरीज होत नाही. या कामकाजात आपण चित्त घातले ह्मणजे आमचे बरे होईल. हा भरवसा पूर्ण आहे.