[२०७] श्री.
पु॥ राजश्री बाबूराव स्वामी गो॥:-
विनंति उपरी. या फौजेबरोबर तोफा कांही असाव्या असें आमचे व सुभेदार यांचे विचारें आहे. त्यावरून राजश्री महिपतराऊ पाठविले आहेत. तरी झांशीतील तोफा चार, येथें उपयोगी पडत ऐशा, महिपतराऊ पाहतील, त्या देऊन तोफांचे साहित्य बैल, गाडे, दोर, दारूगोळे, संदुखा जें सामान लागेल ते देऊन, ताबडतोब तयार करून, मशारनिलेची रवानगी करणें. फार त्वरेने सामान देऊन तोफांची रवानगी करणें. येथे भिंडेजवळ राहून गव्हारांचे पारपत्य केले पाहिजे. मजकूर काय आहे ? होईल. आपण आपले सावधतेनें बहुत रवरदार असावें. वरकड सविस्तर महिपतराऊ सांगतील त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.