[२०३] श्री. ४ मार्च १७६१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष संत्यापसा व विसाजी गोविंद तुह्माजवळ आहेत, त्यांस पत्रदर्शनी हुजूर पाठवून देणें. विलंब न लावणें. जाणिजे. छ २६ रज्जब, सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
[२०४] श्री. २० जानेवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष दिल्लीकडील राजश्री भाऊसाहेब यांजकडून पत्र आलें असलें तर जासुदासमागमें जलद पाठवून देणें. राजश्री नारोशंकर यांस पत्र पाठविलें असे. ते दिल्लीस रवाना करून, उत्तर आणून, जलद पाठविणें. खासा स्वारी हिंदुस्थानास येते. राक्षसभुवनावर मुक्काम आहे. दरमजल हिंदुस्थानास येतों. चिरंजीव राजश्री दादा निजामअल्लीखानास आणावयास गेले आहेत तेही दरकुच अविलंबे येतील. तुह्मी वर्तमान वरचेवर लिहून पाठवीत जाणें. जाणिजे. छ १२ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.