[१९९] श्री. १८ जानेवारी १७६१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि. राजश्री भाऊसाहेब यांजकडील वर्तमान आलें असेल ते सत्वर लिहून पाठविणें. चंद्र १० जदिलाखर, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. + स्वारी माळव्यांत येतांच राजेसुध्दा भेटीस येणें. काम विशेष असेल तर तुह्मीं खासा न येणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[२००] श्री. ३ एप्रिल १७३९.
राजेश्री त्रिंबक विश्वनाथ सुभेदार गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ राणोजी भोसले राम राम सु॥ तिसा सलासीन मया अलफ. राजश्री नारोपंत दी॥ डबीर यांसी ज्येष्ठ मासचे हप्त्याचे ऐवजी रु॥ ५० देविले आहेत. आदा करून पावलियाचे कबज घेणें. जाणिजे. छ ५ माहे सफर. बहुत काय लिहिणे.