[१५५] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. हें खरें आहे जे चार वरसें हरिपंतानेंच मला चित्तास येईल तो केला. गोपाळराज व हे दोघे समजले. आह्मास पैसा न दिल्हा. असो. फजित करणें. दुसरेकाळीं श्रीमंताची जोडी आली; त्यांस आह्मास पत्र आलें त्याचीहि नक्कल करून पाठविली आहे. हें पत्र दरबारीं तों कोणास न दाखविणें. परंतु याचा भावगर्भ काय तो तजविजेनें मनास आणणें. दुसरें तुह्मासीहि श्रीमंत बोलतील. त्यास श्रीमंत मोहिमशीर, आणि दोन जोडी त्यांची आली त्यास कांहीं न दिल्हें तर श्रमी होतील. येथील आमचा प्रसंग तर पैसा कोठें वसूल होत नाहीं. परंतु, लाख रुपये पावेतों जरूरच जालें तर मुदतीनें देणें. महिनेयाचे मुदतीनें अगर दरबारचा प्रसंग पहाल तसें करणें लागेल. सारांश, लाख रुपये पावेतों कबूल करणें. कापडकराचे साठ हजार पावेतों दिल्हेच असतील. वरचेवर आह्मास लिहीत जाणें. लाख रुपये देणें, त्यास तुह्माजवळ ऐवज श्रीचा हुंडीचा, वगैरे असेल तो देणें. भरीस ऐवज पाहिजे तेव्हां र॥ जोशीबावापासून घेऊन जाणें.
तूर्त तुह्मास येथून ऐवज पुणेयांत घ्यावयासी पाठविलें ते घेणें. | कापडकराचा ऐवज साठ हजार वरात जालीं; जरूर देणें आहे, ह्मणून पेशजी तुह्मीं लिहिलें. त्यांजवर कांहीं ऐवज श्रीचा व चाळीस हजारांची हुंडी र॥ विठ्ठल जोशी याजवर पाठविली ते पावलीच असेल. तोही आजी लाजिमा कसा वारिला तो लिहिणें. १. |
|
रुपये. २००० | नरसप्पा देवजी याजवर भोगो तुळजो यांणीं श्रीकाशीहून हुंडी केली. ते पुणेयांत आहेत. त्याजपासून घेणें. |
हालीं श्रीमंतांनीं खर्चाविशीं आज्ञा केली. दोन लाख मागत होते. निदान लाख रुपये तरी देणें येतील. त्यास कांहीं ऐवज काशीचे हुंडी बाबत व हे एकोणीस हजार तीनशें मिळोन व भरतीस लाखाचे शहरीहून जोशीबावास लिहिलें आहे. त्याजकडे पत्र पाठवून हुंडी घेऊन जाणें. दरबार राजी राखणें. कलम १. |
७३०० | मातुश्री वेणुबाई व मातुश्री ताई व र॥ कृष्णाजी बल्लाळ व्याही यांसी र॥ बापूजी बाजीराव यांणीं देविले ते श्रीस हल्ली शिक्का हुंडी करून दिली. ते र॥ बापूजी बाजीराव याजपासून घेणें. ६३०० म॥ हुंडी. १००० मातुश्री वेणूबाई. ----------- ७३०० |
र॥ विष्णूपंताने जागा घेतली. तेथील तूर्त जें जालें तें जालें. पुढें लागूं होईल. भीती मात्र. आवार ठीक करणें. लाकूड यापुढें होईल. नवी जागा वाडेयामागें घेतली तो मात्र सोपा जलदीनें तयार करणें. विहीर बागांत खंटली ते बांधोन सिध्द करणें. नवा वाडा थोर आहे. यंदां गडबड आहे. आह्मीं खर्चाखालें आलों आहों. तेथें काम न बसवणें. साडिलें तों नाहीं आणि जलदीहि नाहीं, असें करणें. १. |
१०००० | शिदाप्पा वीरकर याजवर पेशजी देविले होते. हुंडी छत्रपूरची त्याजवर पाठविली होती, ते पावले असतील. त्यास रुपये घेतले असिले तर उत्तम जालें, न पावले असले तर घेणें. |
सिहीगडावर घर बांधतों ह्मणून लिहिलें. उत्तम आहे. १. |
-------- १९३०० |
येणेंप्रणें घेऊन जमा करून लिहिणें. १ | श्रीमंत र॥ भाऊस्वामी कोठपावेतो गेले तें, काय त्यांचा मनसुबा होता, लिहिणें. १. |
खालीं कोकणांतील कामें करणें त्यास माघमास पावेतों दरमहा तुह्मांकडे नेमिला आहे त्याप्रमाणें देणें. हातरोखे वगैरे कामें आहेत, ऐवज ज्याजती लागेल, ह्मणोन त्यांणीं लिहिलें. त्यांस पांच हजार ऐवज पाहिजे त्याजपैकीं केशवभट लळीत राजापूरकर याची हुंडी, साडेतीन हजार रुपयांची, केली आहे. तो ऐवज त्यास पावला. हजार दीडहजार निदान लागले, काम तटलें, तर तुह्मी देणें. ज्याजती न देणें. कलम १. |
तुळाजी आंग्रे सावतावर गेले. त्यांणीं काय केलें तें लिहिणें. १. | |
श्रीमंत दाभाडियावर गेले. ताराबाईंनी त्यांजला शह दिली. त्यास पुढें कसकसा त्यांचा ह्यांचा तह जाला तें साद्यंत लिहिणें? १. |
||
नवाब नासरजंग मारले गेले. त्यास कोणी मारिलें? कसे जाले? पुढें सरदारी कोणाचे सारिखी जाली? काय त्याचें वर्तमान? तें सांद्यंत लिहिणें. १. |
येणेप्रमाणें करणें. मित्ती माघवद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे आशीर्वाद.