[१२२] श्री. ६ एप्रिल १७२५
राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी तालुके सातारा व तालुके मेढे व तालुके कोरली गोसावी याशि अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्ये स्ने॥ श्रीनिवास परशराम प्रतिनिधी आशिरवाद व असामीस नमस्कार. सू॥ खंमस अशरीन मय्या व अलफ. राजश्री यादो गोपाळ यांनी हुजूर सातारियाचे मुक्कामी येऊन राजश्री स्वामीसंनिध विनंति केली कीं त॥ म॥र येथील खालशाचे जकातीचा ऐवज पूर्वीपासून आपल्या वेतनात पावत आहे. त्यास हल्लीं स्वामींनीं कृपाळू होऊन सदरहू जकातीचा ऐवज वेतनाखेरीज आपणास वंशपरंपरेने इनाम करून देऊन चालविलें पो. ह्मणोन त्यावरून राजश्री स्वामी याजवरी कृपाळू होऊन त्यास सदरहू तिन्ही महालांचा खालशाचे जकातीचा ऐवज दरोबस्त इनाम वंशपरंपरेने देऊन राजपत्रें आलाहिदा सादर जाहली आहेत, त्याप्रमाणें जकातीचा ऐवज आकारेल त्यापैकी- शिरस्त्याप्रमाणें हक्कदार व साहोत्रा वजा करून बाकी ऐवज राहील त्यापैकी स्वराज्याचा निमें ऐवज सरकारांत घेऊन बाकी खालशाचा निमे ऐवज मशारनिल्हे याजकडील कमावीसदारांकडे वसूल देत जाणें. सालदरसाल नवीन सनदेचा उजूर न करणें. या सनदेची प्रत लेहून घेऊन हें पत्र भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. चं॥ १
साबान निदेश समक्ष.