[१२०] श्री.
श्रीमत परमहंस स्वामी यांहीं त्रिवर्गास आज्ञा केली येशीजे. जोगसालवी याजबरोबर साकर वजन खंडी १।
२ सवामण दोन शेर पाठविली आहे. तुह्मी पाठविलीत त्यांतून वजन
१॥ दीडशेर ठेऊन उरली पाठविली आहे ती ठेवणें. पानभारे घरास काय लागतील ते घेऊन ठेवणे. बहुत काय लिहिणे हे आज्ञा. महाग असले तरी घेतां अनमान न करणें. कवलाखाली घालणें, धुळी वारे याचें जतन करणे. बहुत काय लिहिणे, हे आज्ञा. तिघां मुलांस एका रुपयाची द्राक्षे घेऊन देणें. खाले न पाठविणें. आमच्या चित्तास येईल तेथें पाण्याखाले बाग नेमावणें आणि माळशेणींही दोनशे आळी भाजून ठेवणे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा.
[१२१] श्री.
राजमान्य राजश्री यादो गोपाळ यास आज्ञा केली ऐसीजे. तुह्मीं विनंती पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण झाला. सारांश अक्कलकोटकर देशमुख याजकडे आपले मागावयाचा ऐवज होता याबद्दल आज्ञा घेऊन इकडे आलो. यत्नेंकरून शिध्दशेट देशमुख याशीं जरबेंत आणून त्याचेच - रुजवातीनें हिशेब बहुत झाला. ह्याप्रमाणें द्यावयास अनुकूल नाहीं. सबब सर्व ऐकून रोकड ऐवज माल सव्वीस हजार पाचशें सव्वा चोवीस होता. त्याचा कदबा हुजूरचे नांवे वतनाचे अडीनें लेहोन घेतला आहे ह्मणून लिहिलें. ऐशियाशी तुह्मी जाऊन साहस करून कदबा घेतला ही गोष्ट उत्तम केली. या उपरी त्यांनी तहाप्रमाणें निर्गम केला तरी बरेंच आहे. न करीत तर शब्दाप्रमाणें ऐवज तुह्मांस पोहोंचला. पैकी कुलदेवडूनयाचें वतन सरकारांत ठेविले आहें. अत:पर तुह्मी तेथें न रहाता ऐवज उगवून सत्वर स्वामिसन्निध येणें. यावयास दिरंग न करणें. जाणिजे. चं ॥ १९ रबिलाकर.
सुदन असा.