[११९] श्रीभार्गवराम.
पु॥ त्रिवर्गास आज्ञा येशीजे भेलसईचें व नेवासेयाचे चाकर इमारतीकडे असेत त्यांस, अडीच रुपयाचे असतील त्यांस जाफा पावला करणें. पावणे तीचे असतील त्यांस जास्ती चव्वल करणें. जे कार्याचे नसतील त्यांस न देणें. जगंनाथास निपिटी गूळ मण २ दोन मण व तुह्मास गूळ
३ मण, व खडे .॥. दहा मण पाठविली असे ती त्रिवर्ग वाटून घेणें. घरें लौकर बांधणें. कारखाना गोठणें यास पाठविणें. सरकारचे घर राहिलें तरी कामास येईल. आपली घरें आधी करून घेणें. हे लोक चाकर लबाड आहेत. चाकरी करावयाची असती तर घरे मागेंच झाली असती आणि आपले कामावर जाते. हे तुह्मांस मानीत नसतील तर याचे कामकाज धोंडोपंत व बापूजीपंत घेतील. तुह्मी आपले भोळे असा. साकर आहे ती तुह्मांस खाववेल ती खाणें. राहील ती बरण्या भरून ठेवणें. दोन कुतरे पाळा. दरवाज्यावर राखण माणूस ठेवण्यास पाठवितों. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणे हे आज्ञा. मीठ दाभोळी, खायाचे कुडो तांदूळ दिवाण पायलीने कुडो करडे कुडो. ०।१।४ सडीक आहे. मसूर १३। वरंगल सडीक, येक कुडो. येणेप्रमाणें पाठविले असे. पेंड बापूजीपंतास
३॥ व धोंडोपंतास
३॥ बाकी तीन मण चिमणाजीपंतास कोठीपैकीं पाठविली असे. येणेप्रमाणें देणें हे आज्ञा. गूळ येणेप्रमाणे वांटणी.
बापूजीपंत | धोंडोपंत | अंताजीपंत | चिमणाजीपंत |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
बाकी गूळ मण .।. राहिला तो मुंजीस माहादूचे मुलाची मुंजीस ठेवणें.