[११७] श्री. १७१८.
त्रिवर्गास आज्ञा केली येशीजे. श्रीस्थळीहून दोरखडें सुमार २९ येकूणतीस व फाणस अकरा पाठविले आहेत. कान्होजी आंग्रे व ते आले तर त्यांचे भेटीस जगंनाथ व चिमणाजी व उभयतां दोन रुपये भेट ठेवणें; व गवाची कणीक येका मणाची करून भेटीस जाणें. नवे चाकर ठेऊन पाठविले आहेत. त्यांस मुशारा महिना रुपये सव्वादोन असामीस, दोघास ४॥, येणेप्रमाणें शिरस्तेप्रमाणें गल्ला नकद भरून देत जाणें. नावनिशी रामजी भुवडस यास पावले रुपया, १ येक व धोंडजी माहडीक यास पावले रुपया १ येक येकूण दोन पावले आहेत. जाणिजे. चिमणाजीचे आरकाचे तांदूळ ३।४ येकूण तीन कुडव व तीन पाइली पाठविले असेत. नागोजी साळी याजकडील धोतरजोडा १ येकूण किंमत रुपये १॥। पावणे दोन, पातळ १ येक, किंमत रुपया १।, येणेप्रमाणें पाठविली आहेत. मध घागर येक पाठविली आहे. ठेवणें. बहुत काय लिहिणे. आज्ञा.