[११६] श्रीभार्गवराम.
श्रीमत् परमहंस स्वामी यांही चिरंजीव चिमणाजी व उभयतां यांशीं आज्ञा केली ऐशीजे :- लिहिले कीं कारखानाचे लोक डोईस शेर बकशीस मागत तर न देणें.गाठणेयास त्यांही हसके खादले; व नानाप्रकारचे अन्याय बदमामला देखील केले. व यांचें कामकाज कोणें घेतलें आहे, असे असून आह्मी चालवीत असतां, आह्मांस अडवितात कीं, काय तर यांचा लेखा काय आहे ? गल्ला मागतील तर त्याचे महिन्याचे अडीसरींत देणें. रुसकत द्याल तरी आमचे जात नाहीं. तुह्मी ती गावीचे वठे आणून बरोबर धाडणे. बापूजीपंतास आज्ञा कीं महादुचे पुत्राचा व्रतबंध करणें. सामुग्री पाहिजे ती पाठवून देतों. धोंडोपंतास तुपाची घागर पाठवून देऊन केले पाहिजे. भात करण्यास हांडा पाठवावा ह्मणून लिहिलें. हांडा पाठवितों. कोकंबसालें व चिंच कोठें ठेविलीं आहेत देणें. बापूजीपंतास तुपाची घागर उत्तम तूप पाठविले आहे. घागर त्याची त्यास देणें. हे आज्ञा.