[११५] श्री. मार्तंडाचा भंडार. १४ मार्च १७०२.
राजीनामा शके १६२३ वृषानाम संवत्सरे शिमगा वद्य ८ वार मंगळवार ते दिवशी बिहुजूर नागोजी पाटील मोकदम मौजे सुरगांव त॥ रांजणगांव सरकार जुन्नर सुहुरसन ११११ या विद्यमान वि॥
वृत्तिकार
भिवाजी पाटील, संभाजी पा।, फिरंगोजी पा।, काननाक महार, कान्होजी पाटील, राणोजी चेगळ, सुभानजी पोवार, माणीकनाक, महार.
सदरहू जण मौजें पिंपरी ता। कडेपठार प्रां। पुणें राजीना लेहून दिल्हा ऐसाजे. कान्होजी पाटील याचा बाप फत्ते जाला त्या तागाईत देशावर पोट भरून राहत होता. त्यास दरम्यान दोन च्यार वरीस पांढरी वैराण पडली. हल्लीं पिरातीचा कौल गावांस झाला. त्यास दोघे चौघे जे भाऊ होते ते गांवास गेले; आणि कान्होजी पाटील याशी नेवावयासी स्थळमजकुरीस आलों त्यावर कान्होजी पाटील बोलिला कीं आपण परकी, आपली घरठिकाणा पांढरीत, काळी जिराईत व बागाईत हाद महमूद पडवळें ठाऊक नाहींत. आपण येऊन काय करावें? त्यास सदरहू जण पांढरी मिळोन भिवजी पाटील यांचे माथा श्री चा देऊन एकवीस बापाचे व एकवीस मायेचे ऐसे बेताळीस पूर्वजाचे सुकृत माथा घालून भिवजी पाटील जिराईत व बागाईत व महादेवपाशील वावरांतून वाहो. आंबे याची हाद मोहमूदपेडवळे सांगीतलें. तेथून कान्होजी पाटील याणें सुखें खाणें. आपण तेणें प्रो चालू सदरहू जण भिवजी पाटील याचे केळे मोडून तरी गुन्हेगार, आपला कुलस्वामी ही खराब करील, व आपले सप्तपूर्वज अधोगतीस जातील. व दिवाणाची गुन्हेगारी देऊ. व कान्होजी प॥ याचे अपनाचा जाब करूं. राजीनामा लेहून दिल्हा सही.
नि॥ नांगर
बि॥ रामजी गोविंद मौजें सुरगांव.
गोही
हरड.
शिवजी प॥
बिरादर मोकदम मौजें भिंगर.