[११२] श्री. ११ सप्टेंबर १७३०
आज सरसुभा प्रं॥ जाउली व व्याघ्रगड त॥ मोकदनी मौजें साहळी १, मौजें धनकवडी १, मौजे वेळें १, संहुर सन इहिदे सलासीन मया अलफ. श्रीमंत यांची गुरें वीस चरावयास, तीन गावांस हशीलशिवाय चारतील. त्यास तुह्मी अडथळा न करणें. तीन गावाच्या शिवारांत चारणीस येतील. शिवार चारू देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ ९ रविलावल.