[९५] श्रीभार्गवराम. ६ जून १७२८.
श्रीस्वामीचे सेवेशी.
चरणरज अंतशेट कुडाळकर वाणी प्र॥ चिपळूण सेवेशी विज्ञापना. सु॥ समान इशरीन मिया अलफ. स्वामीपासून आपल्या कामाबद्दल कोठीचें भात वरंगळी घाटीं घेतले. -।- येकूण कि॥ रुपये ५ देणें. देणें ते आजिपासून दोन महिनियांनीं सदरहू रुपये आणून देईन. मु॥ अंतर पडिलें, व्याज दर रु॥ ६ प्र॥ देईन. हें लिहिलें सही छ ८ जिलकाद.
ग्वाही.
महादेवभट पुजारी महादजीपंत
[९६] श्री. ११ मे १७२९.
शके १६५१ सौम्य संवत्सरे वैशाख वदि दशमी तद्दिनी श्रीमत् बावा यांचे सेवेशी. हरभट्ट गणपुले यांही भात देणें तें आह्मास द्यायास अनुकूल नसे. तर सेवेशी कतबा लिहोन दिल्हा ऐसाजे. आह्मीं भात देणें सात कुडव ० ते सराईंस सवाईप्रणें देऊं. कतबा लिहोन दिल्हास सही.