नक्कल.
[९३] श्रीरामचंद्र. ११ जून १७३४
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सुभेदार व कारकून
प्र॥ सुपें गोसावी याशी.
सेवक नारो शंकर सचिव, नमस्कार. सु॥ खमस सलासीन मया अलफ. मौजे माळशिरस येथील बाबती श्रीपरमहंस यांस दिल्या आहेत. तर मौजे मजकुरास तुह्मीं एकंदर बाबती व सावोत्रा व किरकोळ वेटबेगार उपसर्ग न देणें. रोखापत्र एकंदर न करणें. मागील पुढील कतबे लाजिमा घेतले असतील ते घारें मोकदमास देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. व किरकोळ खंड, गुन्हेगारीदेखील दिल्ही आहे. तर सदरहूप्रमाणें गांव श्रीकडे चालविणें. बहुत काय लिहिणें. छ २० मोहरम. हे विनंति.