[९०] श्री.
विनंति. चरणरज भांबोजीसाळवी मु॥ विहीर अहिरें सेवेशी
विज्ञापना एसीजे. लोकांचें देणें फाजील तेरीज एकादर प॥ आहे. त्याजवरून विदित होईल. बाकी कोणावर आहे. कोणावर नाहीं ते मागावयास लागले. याजकरितां देणें फाजील पाठविलें आहे. वांटणी काय द्यावयाची ती पाठवून दिली पाहिजे. यानंतर निंबाजी लोणारी याजब॥ आलें तेथें आज्ञा जे :- तुह्मी माप न घेणें. तरी आह्मी मागें घेत नव्हतो. च्यार पांच पत्रें मापारी यास लि॥. परंतु मापारी आला नाहीं. आज्ञापत्र आलें जे :- तुजवर मक्त्यार आहे, तु घेणें ह्मणोन आज्ञेवरून माप घेतलें. कांहीं दिवस चुन्याचें माप राणोजी निकमानें घेतलें. स्वामीचे आज्ञेप्र॥ वर्तणूक करीत असतां मजला शब्द लावावा ऐसें नाहीं. हल्लीं माझा विश्वास नाहीं तरी मापारी कोण तो पाठवून द्यावा. चुना मुस्तदे लोणारी यानें केला आहे. मापारी सत्वर पाठविला पाहिजे. चुना, कोळसे, माती, वाळू रोज देतो. त्यास आह्मास मापारी येथें नेहमींच द्यावा. माप घेऊन जाईल तर आमचा तट होईल. मापारी नेहमीं पाठवून द्यावा. व वाळू बिगर हुकूम कां घेतली ह्मणोन आज्ञा :- तर मी वाळू कोणास नेऊन दिली नाहीं. इमारतीस पाहिजे ह्मणोन घेतली. कारखान्याचे लोक लाविले होते. अठाजणास खंडीभर रोजास न ये याजकरितां घेतली आणि मागें पत्र आलें तेथें आज्ञा आहे जे : लोणारी याजपासून जिन्नस लागेल तो घेणें, काम बळकट करणें, ह्मणोन कामानिमित्य घ्यावयास जाली. एक वेळ आज्ञा होती ह्मणोन लिहिलें नाहीं, इतका अन्याय जाला. हल्लीं वाळूचे रुपये लोणारी याचे द्यावे. व वरकड जिन्नस लोणारी याजपासून पारी पाठवून दिले पाहिजेत. पंचावन रुपये लोणारी यास पावले. आणखी द्यायाचे असिले तरी द्यावें. विदित झालें पाहिजे. लोकांस भांग, व तूप व तंबाकू व तेल ऐसें पाठवून द्यावें. वरकड पेशजीचे वांटणी अलीकडे तेथें आदा जाला असेल तो लिहोन पाठविणें. सुभाना मोऱ्या व हरी असगणकर यांचे रोज गवतावरील अद्याप लिहोन आले नाहींत. हिशेब सुध्दां होत नाहीं. तर त्यांचे रोज लिहोन पाठविले पाहिजे. कागद कोरे अगदीं नाहींत. तरी दोन दस्ते पाठवावें. नाहीं तर पैका पाठविला पाहिजे. हे विज्ञापना. छ ४ मोरम.