[७५] शके १६४९ प्लवंगनाम संवत्सरे तेरीख ११ माहे सौवाल
श्रीशाहूभूपतिनिष्टस्य गिर्माजीतनुजन्मन: ।
कान्होजी भोसलस्येयं भाति मुद्रा यशस्करी ॥
यासी साक्ष.
अंबूराव अमात्य. मालोजी भोसले.
[७६] श्री.
राजश्री रंगो हणजी गोसावी यासी.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजन्य. स्ने॥ रायाजी भोसले रामराम. उपरी भाईअजम शेखमिराजी यासी आह्मीं करार केला आहे. पन्नास स्वारांनशी तुह्मास आह्मापाशी पाठऊन देतों. त्यास एक परगणा सरंजाम लाऊन देऊन सेवा घेऊं. तरी तुह्मीं सदरहू स्वारांनशी आह्मापाशीं येऊन पोहोंचणें. तुमचे आपले विचारे त्यास सरंजाम लाऊन देऊं. तर आह्मीं त्या प्रांतास आलियावर तुह्मीं सत्वर येऊन पोहोंचणें. बहुत काय लिहिणें. छ १ माहे रमजान. तुमचे आमचे विचारें ठीक जालियावर ज्या भल्या माणसास ठेवाल, त्यास ठेवणें. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.