[७४] श्रीशंकर. २१ मे १७२७
श्रीहनुमान
अजम शेखमिरा बई मोहबतहू
छ मोहिबान पन्हाही मुखलिसान दस्तगाहा
अजी कान्होजी भोसले सेनासाहेब सुभा. सुहुरसन सबा अशरीन मया अलफ. तुमचें कर्ज आह्मी देणें होतें. मुद्दल रुपये २१९५० एकवीस हजार नवशे पन्नास रुपये देणें होतें. त्याचा करार साताराचे मुक्कामीं जेष्ट शु ॥ त्रयोदशीस केला. रुपये ३०००१ तीस हजार एक सदरहू तुमचे रुपये द्यावयाचे वायदे केले रुपये.
१५००० खरिफाचे हंगामीं अखेर पौष सी द्यावे रु.॥
१५००० रबीचे हंगामीं अखेर जेष्ट मासीं द्यावे रु.॥.
-----------------
३००००
येकूण तीस हजार रुपये रास वायद्याप्रमाणें तुह्मी आपला भला माणूस आह्माजवळ पाठवणें. त्याचे गुजारतीनें मौजे कासवदें प॥ येरंडोल सुभा- खानदेश येथें गढींत पावतें करून. जरी रुपये पावतें करावयास अंतर करूं तरी आह्मांस आमचे आराध्य श्री ची शपथ असे.