[७२] श्री. ११ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणीं अजम फरीदखान यासी आज्ञा केली ऐसीजे :- तुचेविशी राजश्री बऱ्हाणजी मोहिते यांणीं विनंति केली त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी तुह्मी हुजूर दर्शनास येणें. येथें आलियावर आज्ञा करणें ती केली जाईल. जाणिजे. छ २३ रविलाखर ज्यादा काय लिहिणें.
[७३] श्री. २० सप्टेंबर १७५०
अजम शेखमिरा यासी आज्ञा केली ऐसीजे:- आज गुरुवारी कळंबीनजीक आऊंद येथून कुच करून सावळी क॥ आऊंद येथें येऊन मुक्काम केला. तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. लोकांस ताकीद करून वाडियांत रात्रंदिवस चौकीपारा करून खबरदार राहाणें. जाणिजे. २९ सवाल सु॥ खमसेन मया अलफ. बहुत काय लिहिणें.