[६९] श्री. १३ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणीं त॥ मोकदम मौजें माहागांव प्र॥ वांई इहिदे खमसेन मया अलफ. सरकारचीं भांडीं शहरांत आहेत. ती गडावर न्यावी लागतात. तरी गोणी वीस पाठवून देणें. या कामास लोक दि॥ हुजरे प॥ यांस रुपये एक देणें जाणिजे. छ २५ माहे रविलाखर. लेखनावधि.
[७०] श्री. ११ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब यांणीं अजम. शेखमिरा व लोक हुजरात यांशी आज्ञा केली ऐसीजे :-
राजेश्री नारोजी शिंदे यास कारखानियाचे देखरेख करून कारखाने उघडोन ऐवज व वस्तभाव व कापड व गला हरजिन्नस किल्यावरी हुजूर आणावयास पाठविले आहेत. तर ज्याचे जिम्मेस जो कारखाना आहे तो उघडोन म॥ निल्हे जे वस्तभाव आणितील ती आणून देणें. येविशी उजूर न करणें. जाणिजे छ २३ हे रविलाखर, सु॥ इहिदे खमसेन मयाव अलफ. ज्यादा काय लिहिणें.
[७१] श्री. १५ सप्टेंबर १७५०
अजम शेखमिरा यासी आज्ञा केली ऐसीजे. राजजी पाटिलाच्या स्वाधीन आहे, तें लोकास वांटून द्यावयास मागता ह्मणून विदित जाहलें. ऐशियास कामकाज लागलें, तरी, मण दोनमण दारू लागली तरी घेऊन वांटून देणें. वावगी खर्च न करणें. आगत्य जरूर लागलिया घेणें. छ २४ सवाल, सु॥ इहिदे खमसेन मया अलफ. बहुत काय लिहिणें.