[६३] श्री. २० जून १७०९
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधीनाम संवत्सरे आषाढ बहुल अष्टमी इंदुवासरे, क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणीं शिक्का शिक्का मोकदजी मौजे वोझर्डे संमत हवेली प्र॥ वांई यांस आज्ञा केली ऐसीजे :* त्यास मौजे म॥ पेशजी सूर्याजी पिसाळ याजला इनाम होते, तें मध्यें दूर केल्यामुळे याकडून दूर करून किल्ले वैराटगडाकडे दिल्हा होता. तो हल्ली किल्लेम॥कडून दूर करून सूर्याजी पिसाळ यांस इनाम करार करून दिल्हा असे. तर तुह्मी याशी रुजू होऊन वसूल याकडे देत जाणें. जाणिजे. लेखनालंकार मुद्रा.
रुजू
बार सुरू रुद्र बार.