कर्ज तुह्मावरी घातले. तुह्मी फरीख करून निमे देशमुखी खाणें. कर्जाचा दावा तुमचा आह्माशी कांही नाहीं. कर्जाचा तुमचा बेदावा केला असे. तरी प्रांतमजकुरचे देशमुखी बराबरी दोठाई घालून सुखी असावें. शिका पानमान नाट तश्रीफ तहरह जमाबंदी हक्क लाजिमा इनाम जमीन व इनामगाऊ, शेव, धार, उकाळा बाजार, घाट, मेठ, जकाती, विस्वा, पत्र लोणी व बाजें उत्पन्न होईल तें येणेंप्रमाणें खाऊं. बितपशील
कलम.
किता येक १ कलम शिक्का दोठाई, आधी आमचा, मग तुमचा येकूण शिके दोन करावे. व दस्तकें दोन, आधीं आमचें मग तुचें नांव लिहीत जावें. कलम १ |
पानें तुह्मी आह्मीं बरोबरी घेत जावें कलम १. |
तश्रीफ बरोबरी कलम १ हाक लाजिमा व इनामगाऊ व इनाम जमीन तपशिलाप्रणें बरहु॥ जमीन तपशिलाप्रणें बरहु॥ वांटणी जाबता निमेचा निमेचा आहे. त्याप्रमाणें खावें. कलम १. |
तहरम जमाबंदी व कारभार तुह्मी आह्मी मिळून करावा. कलम १. |
पैदागिरी व मागणी जें मिळेल ते निमेंनिमें वांटून खावें. कलम १. |
शेव, धार, उकाळा, घाटमेट, जकाती, विस्वा व पत्र, लोणी व बाजें उत्पन्न होईल ते निमें निमें खावें. कलम १. |
सदरहू कलमाचे लिहिलेंप्रमाणें तुह्मी आह्मी लेंकराचे लेंकरी खाऊन सुखी असावें. लिहिलेप्रमाणें बिला कुसूर चालो. यास आह्मी तुह्माशीं बेइमानी करूं, तरी कृष्णेमध्यें मात्रागमनाची आण असे व कुलस्वामी श्री पद्मावती व सोनेश्वर व महाबळेश्वर व धोमेश्वरव सिध्देश्वर व भद्रेशर व रामेशर यांची आण. व आपले वडील बेताळिसांची आण असे. व गाई ब्राह्मणाची आण असे. हा लिहून दिल्हा महजर४२ सहीं.
शिक्का