[४३] श्री
श्रीमंत परमहंसबावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज आनंदराऊ पोवार. दंडवत. विनंति. येथील क्षेम महाराजाचे आशीर्वादें श्रावण बहुल त्रयोदशी मु॥ कविठें यथास्थित जाणोन स्वानंदवैभव लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामीचे सेवेशी तुलसीच्या मुद्रा चार पाठविल्या आहेत. आणि वस्त्र एक चांदणी पाठविली आहे. ते प्रविष्ट जालियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. विशेष. र॥ जिउबा येथें शिवाजीपंताकडे पैकिया निमित्य आले हैत. त्यांनी आमचा प्रसंग पाहिला. ते सेवेशी विनंति करितील ते मान्य करून आमची साहैता केली पाहिजे. आह्मांस आपण पद्री घेतलें आहे. आमची सर्व प्रकारें साहेता करावी. विशेष ल्याहावें तरी आमचा अंगीकारच आपणाकडे आहे हे विनंति.