[४२] श्री ३ नोव्हेंबर १७५०
भार्गवरावस्वामी.
राजश्री तानाजीराव दरेकर हवालदार व कारकून के॥ महिपतगड गोसावी यासी. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ सदाशिव चिमणाजी आशीर्वाद व नमस्कार. सुहुर सन इहदे खमसेन मयाव अलफ मौजें आंबडस ते॥ खेड हा गांव श्री यांकडे इनाम आहे. ऐसें असतां तुह्मी तेथील वसूल सालगुदस्ता व सालमजकुरीं कांही घेतला आहे, ह्मणून विदित जालें. तरी पेशजीपासून इनाम चालत आहे. तेथील उसूल घ्यावयास प्रयोजन नाहीं. या उपरी तेथील जो वसूल घेतला असेल तो फिराऊन देणें. फिरोन त्या गांवचे वांटेस नच जाणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज. आज्ञाप्रण.
श्री.
राजा शाहू नरपति
हर्ष निधान
बाळाजी बाजीराव प्रधान.