[३९] श्रीभार्गवराम
पु॥ नारोराम मु॥ इरती पूर्णगड यासी आज्ञा केली ऐसिजे.
तूं संभा पवार याजबरोबर पत्र पाठविलें तें पावले. त्याचें उत्तर. सरदेशमुखीचे वरातदार डोरले महाळुंगे या गांवावर आले आहेत त्याचे काय आज्ञा तरी :- तुह्मी कारकून शहाणे लिहिणार आणि सरदेशमुखीकडील वरातदार शाहू राजे याचे तरफेचे कीं संभाजी राजाकडील हें कागदीं लिहिलें नाहीं. हल्लीं वरातदार संभाजी राज्याकडील असले तर अर्धा वसूल विशाळगडीं पावला, त्याजकडील काय खंडणी गांवकरांहीं सालमजकुरीं केली असेल, त्याजवर अर्धी सरदेशमुखी रिवाजाप्रणें गांवकर देतील. शाहूजी राजेकडील आह्माकडे पावेल. आणि शाहूजी राजाकडील वरातदार असले तर तोंडावर मारून वांटेस लावणें. पैका न देणें. येथें याचे निजबत कळतें तरी मनारोखा पाठविला असतां.
पूर्णगड इमारतीकडेस तुजकडेस आजि तागायत नगद रुपये गोठणें यातून काय पावलें. गल्ला वजनी सुमारीं जिन्नस काय पावले. डोरले महाळुंगे येथील काय पावलें, तें तपशीलवार जमा व आजि तागायत खर्च काय बाकी शिलक काय आहें तें लिहोन हिशेब पाठवणें. नगद ऐन जिन्नस हिशेब पाठविणें. अडीच रुपये आह्मी पाठविले ते आमचे जतन ठेवणें. खर्चास नगद लागेल तें त्रिंबकपंत देतील. त्याजवळ गणें. गोठणे, डोरले, महाळुंगे याचे रुपये वसूल वरातदार करतील तूजवळ आणून देतील. ते जतन ठेवून अमके पावले ते चिटी लिहोन पाठवणें. डोरले महाळुंगेचे कुळगत हिशेब करून बाकी बेमुलाहिदा घेणें.
जयगडीं गेल्याचे सनद पावलीं नाहीं. हवालदार ह्मणतात सनद पावल्यावर गल्ला पाठवून. तरी सनद आजीवर परशरामी राहिली होती. हल्लीं रवाना तेथून केली आहे. गल्ला घाटी दहा खंडी पावेल.
तिखे कोचीस नाही म्हणून त्यावरून हल्ली सभांजी पवार व सखा पवार २१ त॥ रामाजी चव्हाण ७, डोराले महाळुंगे याचे साल गुदस्ताचे हिशेब महाळुंगकर याजबराबर पाठविले आहेत म्हणून कागद लिहितात. आणि येथे हिशेब आले नाहीत कोठे राहिले ते मनास आणून आजि पाठवावे. होते ते न पाठविले साल गुदस्त त्याजवर विशालगडचा कज्जा पाडिला. अखेर बाकी काय राहिली ते कळावी. त्याजपैकीं त्याजकडे काय देणें ते देऊन उरली बाकी घेणार याजकरितां हिशेब आणविले ते तुह्मी आपले दप्तरचे हिशेब न पाठवा. तुह्मी चाकर आमचे असतेत तर पाठवितेत. व साल मजकुरी पूर्णगडीं गल्ला काय दोही गांवचा पावला. व नक्त रुपये काय पावले. हबशी पट्टीचे रुपये काय पावले, काय न पावले ते लिहोन तुह्मी उभयतांही पाठवावे ते न पाठवा. महाळुंगेचा निम्मेचा वसूल झाडून घेतला. रयत पळाली ह्मणून त्रिंबकानें लि॥ आणि आतां वसूल पावला नाहीं ह्मणता. तर निम्मेचा पावला असें का लिहावें होतें? आता वसूल राहिला तो कोणें घ्यावा? कुळें ह्मणतात झाडून वसूल दिल्हा. याजकरितां कुळावर हिशेब करून वसूल आह्मीं हिशेब पाठविला आहे. तेणें प्र॥ घेणें. वसूल लिहोन पाठविणें. चाळीस पन्नास रुपये दुमालापैकी राहिले असले तर लिहोन कुळगत बाकीं पाठविणें. रयत आल्यावर विल्हे करून. येणेंप्रमाणें वर्तणूक करणें. शहाणपणें धंदा करणें. छ ७ रमजान हे आज्ञा.