नक्कल
[३८] श्री १२ सप्टेंबर १७३०
श्री सकल तीर्थस्वरूप श्री मत्परमहंस स्वामीचे सेवेशी.
अपत्य सन शाहूजी राजे कृतानेक दंडवत. विज्ञप्ति. येथील कुशल भाद्रपद शुध्द १२ मंदवासरे स्वामीचे आशीर्वादे यथास्थित असो. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र प्रेशिलें तेथें आज्ञा :- मौजें आनेवाडी आपण श्रीस दत्त केली. तेथें राजश्री पंडितरायाची इनाम जमीन चावर आहे. त्यास सांप्रत आपला इनाम आपणांस देणें ह्मणोन त्यांणीं ब्राह्मण पाठविला होता. त्याचा निरोपद्रव होईल तर उत्तम. नाहीतर तो गांवही लागत नाहीं, ह्मणोन कितेक विस्तार लेख केला. त्यावरून राजश्री पंडितरायास स्वामींनीं आज्ञा केलीजे. त्याचा मुबदला दुसरें जागा तुह्मांस इनाम जमीन देऊं. आनेवाडीच्या चावरास तगादा न करणें ह्मणोन त्यावरून त्यांणीं मान्य केलें. आनेवाडीच्या चावरास पंडितरायाचा उपसर्ग लागणार नाहीं. स्वामीपेक्षां दुसरें अधिकोत्तर आहे ऐसें नाहीं. श्रीप्रसाद श्रीफल पाठविलें तें पावलें. वरकड वर्तमान शिवराम सेवेशी निवेदितां श्रुत होईल. विदित होय.