[५६७] श्री.
मुसवदा स ॥ उधोपंडत, किल्लेदार, दौलताबाद.-
सयेदजयेन आलादिन उर्फ खुब साहेब पीरजादे, फार थोर, उमदे, दौवलतदार होत्ये. पहिलेपासून दौलत होती. उपरि दौलत दुनिया सोडून दिधली आणि फकीर जालियावरी मक्केस गेले. फिरून आले. दौलताबादेमध्यें मोमीनपुराचे हमसाये दरगाबारा आमचा होता. वडिलाचे हातचा होता. त्यामध्यें जाऊन आपले दरग्यांत बसला. दिगर नुरा कोतवाल थोर चोर होता. पिरजादे याचा नवा मीर हमीद माणूस त्यास कोतवालानें आपलेसें करून भेद घेतला. ज्या कोथडीमध्यें माल होता ते कोथडी तहकीद करून माल कूल कोथडी फोडून, कोतवालानें चोरी करून, कूल मालमत्ता मोहरा व होन व जोहीर कबिलयाचे वगैरे माल नगद रुपये वीस हजार रुपयांचा माल २०००० विसाहजारांचा माल चोरून गदियांत कोतवालानें चोरून नेली. वगैरे माघ जिन्नस जरतारी वगैरे कबरस्थानावरी टाकले. नगद ऐवज घेऊन गेला. दिगर माजी किल्लेदार महेंदी अल्लीखान व चेला नसरत याच्या आसऱ्यामध्यें कोतवाल होता. किल्लेदार तगीर जाल्यावरी दुसरा किल्लेदार नबाब सलाबतजंग यांचेतर्फेनें सयदे शेरिफखान व आपाजीपंत दिवाण यांस किल्लेदारी जाली. नबाब सलाबतजंग व दिगर आमील याही परवाने पोंहचाविले कीं, पिरजादे यास दगा केला, कोतवालास धरून पिरजादे याची मालमत्ता देवणे. हें ऐकोन कोतवाल आमचे माणूस हमीद यासही सांगाते घेऊन पळोन गेला. हल्लीं आतां पेशवे नानासाहेब यांचा अम्मल जालियावरी किल्लेदाराशीं मिळोन बसला आहे. दिगर पेशवे याचें धर्मराज्यें इनसाफ आदल आहे. तरी चोरास धरून त्यापासून माल घेऊन जो ऐवज वसूल जालियावरी चौथाई तुह्मी घेणें. दुसरीं चौथाई पेशवे यासी देणें. बाकी ऐवज सयेदास देववणें. तुह्मांस मोठा सबब होईल. हें काम अगत्य करणें. अवरंगाबादचे लोक व दौलताबादचे लोक लहान थोर चोरास वाफिक आहे. हे गोष्ट तहकिक आहे. हें काम अगत्य करणें. हे अर्जदास्त लिहिली असे.