[५५६] श्री. ३ सप्टेंबर १७४८
यादी कलमें कांही जाबसाल जाहले कांही बाकी राहिले आहेत.
१. | सरकारचे रुपये निशा पडल्यावर दुसरीं कांहीं कलमें काढूं नयेत. निरोपच द्यावा. कलम १ |
१. | कैलासवासी तीर्थरूपाचे वेळेस व आमचे हातचे कर्जदार कोणास रुपये पावले कोणास पावले नाहींत. त्यांचा गवगवा तगादा होऊं देऊं नये. फजिती सर्वांनीं दरबारीं केल्यास आब राहणार नाहीं. येविशीं सरकारांतून सांगितलें पाहिजे. निर्विघ्न आपले प्रांतांत जाहल्यावर आपल्यावर तजविजीनें जे मार्ग निघतील. कलम १ |
१. | मोंगल येईल, वराड देवगडाकडे, तर येऊन द्यावा. हें साहित्य निर्विघ्न करावें. त्याचा आमचा हर्षामर्ष न वाढावा तें करावें. गु तह केला मोंगलानें प्रों चालावें. कलम १ |
१. | भेटी जालियावर आठापंधरा दिवसांत निरोप द्यावा. कलम १. |
१. | वीस हजार पंचवीस हजार फौज जमा झाली हें कोणीकडे मुलुखगिरीस जाईल तरच अखेर सालीं आब राहील. परभारें समजावीस फिटली पाहिजे. याजकरिता भेट जालियावर फौजेस निरोप द्यावा. कलम १ |
१ | बंगालियाच्या ऐवजास खळखळ पडली आहे. त्यास सुदामत प्रों ताकिदी द्याव्या. सुभ्यास व निखालस श्रीमंत दादासाहेब मकसुदाबादेस न जात, आमचा रु॥ न बुडे, तें करावें. ते दादासाहेबांसही पत्रें हिंदुस्थानांस पाठवून द्यावीं व आह्मांजवळही पत्रें त्यास द्यावी, जे मकसुदाबादेस सुभ्याकडे खळखळ न होय. ऐसें निखालस करून घ्यावें. कलम १. |
१. | सावकार सरकारचा ऐवज देतील. वाजवी आहे तो त्यास सरकारचें पत्र आपण सावकारास जे निशा करतील त्यांस द्यावें. जे रुपये देणें. सरकारतर्फेनें राजश्री सेनासाहेब सुभ्याचे मामलतींत घालमेल करणार नाहीं, ऐसें पत्र. कलम १ |
१. | कोणी भाऊबंद वगैरे याचा कोणी मजकूर करतील ते चित्तावर घेऊं नये. मागें श्रीकृष्णातीरीं सांगितलें आहे. साहेबीं त्याच्या प्रा निविष्ट सांगावें. त्यांचें कांहीएक चित्तावर घेऊं नये. कलम १ |
१. | दरबार आहे. कोणी कांही लिहितो. बाहेरचे लटकें एखादें जोडितो. सबब जे त्याचे रुपये मागितले न दिले. सरकारचे नुकसानाची एखादी रदबदल करून पांच रुपये घेतो आणि काम करून द्या ह्मणतो. न मानिलें तर भलतेंच नाना प्रकार विकल्प घालितात. त्याचा शोध बरा घेऊन खरें लटकें पहात जाणें. कलम १ |
१. | गढे प्रांतीचे मा नि चे आलीकडील पहिले प्रा ताकिदी द्याव्या. कलम १ |
१ | गु॥चे रुपये छत्तीसगडचे आह्मांकडे वसूल नाहींत तें कलम १ |
१ | सिबंदी जाऊन बाकी राहील ते हल्लीं ऐवजीं मास द्यावें. कलम १ |
--- | |
१२ |