[५५४] श्री.
मा अनाम जमीदार परगणें माहीम सुभा प्रांत वसई यांसी :-
बाळाजी बाजीराऊ प्रधान सु इसन्ने अर्बैन अलफ. शंकराजी केशव व धोंडो केशव व बाळाजी केशव व केसो महादेव व महादजी केशव यांचे पुत्र गोत्र अत्री सूत्र आश्वलायन उपनाम फडके पुरातन वतनदार उपाध्ये मौजे कुरघें ता पावस सुभा प्रांत राजापूर हालीं वास्तव्य कसबे पुणें प्रा मजकूर हे वसई प्रांतें हा मुलूख फिरंगियांकडे होता त्यास वसई प्रांतें मुलूक सर करावयास मशारनिलेस मसलतेस रवाना केलें. त्यांणीं ते प्रांतें फौजसुध्दां जाऊन श्रमसाहस बहुत केले. व शंकराजी केशव यांचे बंधू महादाजी केशव कसबे माहीमचे कोटास सन समान सलासीन मया अलफ मध्यें मोर्चे दिल्हे होते तेसमयीं युध्दप्रसंगांत स्वामिकार्यी कामास आले. व शंकराजी केशव याणीं जीवादारभ्य श्रमसाहस करून कितेक कामेंकाजें करून सेवाधर्म संपादिला. याजकरितां मशारनिले यांचे चालवणें आवश्यक जाणून, याजवरी कृपाळू होऊन, नूतन वतन प्रा मजकूर येथील देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण देखील जकायत व बंदरें व देहहायेचें वतन करार करून दिल्हें असे. देहे बितपशिल:-
कित्ता देहे. | कित्ता देहे. | कित्ता देहे. |
१ कसबे माहीम. | १ मौजे केळवें. | १ मौजे उसरणी |
१ मौजे मथाणें. | १ मौजे भादवें. | १ मौजे चवाळें. |
१ मौजे टेंभी. | १ मौजे सरवली. | १ मौजे माकणें. |
१ मौजे सफाळें. | १ मौजे कांबेरभुरें. | १ मौजे धामणगाव. |
१ मौजे कमारें. | १ मौजे कांदरवण. | १ मौजे नवाळी. |
१ मौजे झांजिवली. | १ मौजे मांडे. | १ मौजे खारेकुरण. |
१ मौजे कपासें. | १ मौजे दासगांव | १ मौजे मतोडें. |
१ मौजे वरखुंटी. | १ मौजे टोकराळें | १ मौजे पाली. |
१ मौजे गावनें. | १ मौजे अंबडी. | १ मौजे नंदोडे. |
१ मौजे हेबघर. | १ मौजे करवाळें. | १ मौजे खटाळी. |
१ मौजे सावरें. | १ मौजे मोहाळें. | १ मौजे खोडावें. |
१ मौजे काळहाव. | १ मौजे वाघुलसार. | १ मौजे नवघरखुर्द. |
१ मौजे दातिवरें. | १ मौजे अकळी. | १ मौजे कोळगांव. |
१ मौजे शिरंटे | १ मौजे भुताळें. | १ मौजे मायखोप. |
१ मौजे उंबरवली. | १ मौजे येडवण. | १ मौजे कोरें. |
१ मौजे अगरवाडी. | १ मौजे डोंगरें | १ मौजे बंधाटे. |
१ मौजे विराथन खुर्द. | १ मौजे वाकसई. | १ मौजे दहीसार. |
१ मौजे जलसार. | १ मौजे तिघरें. | १ मौजे नागावें. |
१ मौजे दहीवाले. | १ मौजे माकुणसार. | १ मोजे वेडी. |
१ मौजे तांदूळवाडी. | १ मौजे मुंजुरली. | १ मोजे वीराथन बुद्रुक. |
१ मौजे खडकवली. | १ मौजे वाढीव. | १ मौजे नवघर बुद्रुक. |
१ मौजे दापोली. | १ मौजे पेणंद. | १ मौजे उचकोळी. |
१ मौजे पंचाळें. | १ मौजे कळठण. | १ मोजें उंबरपाडा. |
१ मौजे मोरेकुरण. | १ मौजे शिरगांव. | १ मौजे चापडिवाहदर्यागर्ख. |
१ मौजे कांबळगांव. | १ मौजे विळगी. | १ मौजे शहापूर. |
१ मौजे रोठें. | १ घनसार. | १ मौजे बऱ्हाणपूर. |
१ मौजे पालघर. | १ मौजे मारवली. | १ मौजे महापूर. |
१ मौजे वितूर. | १ मौजे सलवाले दर्यागर्ख. | १ मौजे खरपुसी. |
--------------- | --------------- | --------------- |
२८ | २८ | २८ |
एकूण देहे ८४ चवऱ्यांशीं जिरायत व बागायत व घरपट्टी व ठाण व मोहतर्फा व ताड व माड व भंडारथळ देखील खुमार व कोळी व मच्छीमार व तरीउतार वगैरे व जराईब व पट्टीबाब व कमावीस व जकायती व बंदरजलमार्ग व उभामार्ग व मीठमार्ग व थळभरीत व थळमोड व सिंगसिंगोटी व रेंदे व गादिया देखील कुलबाब कुलकानू सरकारी जमाबंदी होईल त्याजवरी हक्क रयत निसबत बितपशिल करार करून दिल्हा असे :-सरकारी जमाबंदी करार
एकूण कलमें तेवीस सदरहूप्रमाणें सालमजकुरापासून देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर यांस प॥ मजकुरीं करार करून दिल्हीं असेत. तरी तुह्मी देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी यांचा हक्क व लवाजिमे व इनाम गांव व आगरवाडिया व मानपान, ठिळा, विडा देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवीत जाणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर याजवळ भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. छ १५ सवाल.