लेखांक १८६. १७१५ चैत्र वद्य ५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष रा राजे धरमवंतबाहादूर मुतसदी नवाब बंदगानअली याणी वर्तमान सांगितले की मौजे तुळजापुर ऊर्फ चव्हानवाडी पा हाटे सरकार नांदेड हा गांव महमद दौलतखानबाहादूर याणी आह्यास तवजा केला आहे तेथील चौथ बाबती सरदेशमुखी व साहोत्र्याची मामलत खानमार पामजकूरचे मामलतीत फडच्या करून देतात त्यास येविसीं आपण बळवंतराव सुभेदार यास पत्र द्यावें त्याजवरून हे पत्र लिा असे की मौजेमारचे स्वराज्याचे मामलतीचा फडच्या पामारचे अमलात सुदामतप्रो खानमार याजकडोन करून घ्यावा मौजेमारास मुजाहीम न व्हावें कदाचित् खानमार न करून देतील तरी लिहून पाठवावें रा छ १९ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)