महार रघुनाथ जाफराबादेत लेखांक १३८. १७१४ फाल्गुन वद्य २.
वानवळ्याकडील यास पत्रे पुरवण्या
दोन रा छ १६ रजब.
पु।। राजश्री मल्हारपंत खामीचे सेवेसी-
विनंति उपरि तुली हरबाजी नाईक यांचे पत्री लिा कीं पा जाफराबाद एथील जमाबंदी साल तमाम जाली त्यांत सातहजार ऐवज तहकूफ ठेविला तो गांवगना पिके पाहून जेथें * * * * * ऐवज कौला प्रा घ्यावयाचें बापूजीपंत असतां ठरलें हली पुण्यास गेले तुह्मास मोहाली ठेवलें गांवगना पाहाणी करून ऐवज मालाहालाप्रा घ्यावा लागेल बापूजीपंत आल्यावर अभिश्राप यास्तव कोणी विश्वासूक पाठवावा ह्मणोन लिा त्यास मारनिले पुण्यास गेले तुह्मी माहाली कामावर आहां त्यापक्षी गांवगना चौकसी खबरदारीने करून पाहाणीअन्वयें बमोजीब कौल व साधणूक कारस्थानीने होईल तेथपर्यंत करून ज्यांत सरकारी नुकसान न होतां किफायत तें अमलात आणून ऐवज गांवगनाचा वसूल करून जमा करावा इकडे लेहून पाठवावें रा छ १६ रजब सलास तिसईन हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)