मानाजीराव सिंदे चडचकर यांचे लेखांक ८२. १७१४ पौष शुद्ध १४.
पत्राचा जाब रा छ १२ जावल
सन १२०२.
राजश्री मानाजीराव सिंदै गोसावी यांसि-
७ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष तुह्मी पत्र पा तें पाऊन सविस्तर मा अवगत जहाला मौजे आंकलगी व हाताली वगैरे देत पा बारडोल एथील बंदोबस्ताविसी राजश्री गोविंदराव यांस एक पत्र पाठवावें व परभारेंहि त्यांजकडे आमचे साहित्याविसीं पत्रें जात असावी व आमचे लोक सिद्ध आहेत त्यास एथें राजश्री रघोतमराव याणी अटकाव केला आहे त्यास येविसी नवाब अजमुलउमरा-बाहादूर यांसी बोलून ते जसें सांगतील तसी आज्ञा यावी ह्मणजे त्या प्रो वर्तणूक केली जाईल ऐसियास राजश्री गोविंदराव यांस मौजे नीरआंकलगीचे बंदोबस्ताविसी पत्र पा आहे व परभारेंहि लिहिण्यांत येईल तुह्माकडील लोक येण्याचा मार बाहादूर-मजकूर यांस पुसिला त्यास यांचे सांगण्यांत कीं एक महिना याचा एथून आहकाम पाठवितों एका महिन्यांत तेथील काम करून लौकर हाजुरांत यावे त्यास यांचे पत्र मागाहून रघोतमराव याजकडोन तुह्मास पावेल त्या प्रो आमलांत आणावे र।। छ १२ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)