राजश्री राज्याजी यांस रुका लेखांक ८०. १७१४ पौष शुद्ध १४.
बाबाच्यार्य माणूरमाषालकर यांचे
कार्याविसीं रा छ १२ जावल
सन १२०२.
राजश्री राज्याजी स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि मौजे दिकसिंगी पा अफजलपूर हा गांव वो राजश्री आप्पाच्यार्य माणूरमाशालकर यांजकडे बहुता दिवसापासोन चालतो दरम्यान हरकत जाली होती ते समईं सर्वानी साहित्य करून ठराविलें की तीनसे रुपये सरकारांत आच्यारी याणी देऊन दरोबस्त गांव आपले वहवटींत ठेवावा त्याप्रो आजपावेतों नवाब अजमुलमुलुक-बाहादूर याणीहि चालविलें सांप्रत पा–मजकूरचा अमल महमदसिदीइमामखान-बाहादूर यांजकडे जाला त्याणी गांव-विसी दिकत घेतली आहे याजकरितां आच्यारी याणी आह्मास व आपल्यासहि पत्रे लिहिली आहेत त्यास हें धर्मकृत्य आहे येविसीं आपण बाहादूरमार यांस सांगून मौजेमारची सोडचिठी देवावी ये विसी आह्मी नवाब अजमुलउलुकबाहादूर यांस लिहिला आहे जरूर घडवावें धर्मकृत्य श्रेयस्कर आहे रा छ १२ जावल हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)