र।। गोपाळराव धोंडदेव नलेगावकर लेखांक ७७. १७१४ पौष शुद्ध १३.
यांचे पुतने धोंडो बापुजी याणी पत्र
पा होते त्याचा जाब रा छ ११
जावल सन १२०२ फसली.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री धोंडोपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पाठविलें ते पावलें राजश्री गोपालराव पुणियात आहेत सजावारुदौला जमयेत सुधां माठीचे गढीवर जाऊन सर केली तेथून नळेगांवास उपसर्ग करण्याचे त्याचे मानस दिसतें यास्तव येविसींचा बंदोबस्त दरबारी करून पाठवण्याची आज्ञा व्हावी ह्मणोन तपसिले लिहिलें ते कळलें त्यास सजावारुदौला यांस नवाबाचे सरकारांतून माठीची गढी घेण्याविषई हुकूम जाल्या प्रो मानिलेनी ठाणे तेथील घेतले हाली सजावारुदौला उदगिरीस आल्याचे वर्तमान आहे नळेगांवास उपसर्ग बहुधा होणार नाही तथापि तुह्मीहि सावधपणे असावें नवाब अजमुलउमरा बाहादूर यांसी बोलून मागाहून लिहिण्यात येईल रा छ ११ जाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.