राजश्री सिवरामपंत बहेरी बाहादूर लेखांक ७५. १७१४ पौष शुद्ध १३.
यांजकडोन व्यंकटराव सर सुभेदार
याजकडे आलें त्या बहेरी व पा
सुभेदार यांची पत्रें होती त्याचे जाब
रा छ ११ जावल सन १२०२.
फसली.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी बाहादूर गोसावी यांसी- सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष पत्र पा ते पावले राजश्री सिवापास आपणाजवळ देऊन पा आहे आणी लाख रुपयाचे रसीदपत्र राजश्री सर सुभेदाराचे आपले नावें देऊन पा आहे पावसामुळें संस्थानावर कसाला हे सिवापा सांगतील ह्मणोन लिहिलें त्यास सिबशंकरपंत यांजला आपण रवाना केलें मारनिले एथें आले सर सुभेदाराची रसीद लाख रुपयाची आद्याप आह्मापासी आली नाही आल्यानंतर लिहिण्यात येईल नवाब मंत्रीसी संस्थान-समंधें जाबसाल बोलण्यात आला त्याचा ठराव काय जाला हे काहीच लिहिण्यांत आले नाही त्यास जाबसाल काय ठरला हें लेहून पाठवावें त्या प्रो मंत्रीसी बोलण्या येईल रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)